जगाच्या पाठीवर वावरत असताना कधी कधी विचार येत आसतो, तो आसा की आजचं जग. खरच खूप बदलय ना, पण ना बदालाय तो आजचा शेतकरी का ? त्याला बदलाव अस वाटत नाही, पण तो बदलत नाही . का ? व कुणासाठी ? बदलायव त्यान .. जगासाठी. मला येथे असे नमूद करायला खरेच आवडेल ते असे की आजचा शेतकरी आणि त्याच जीवन कारण की तो जीवन जगताना कुणाचा विचार करतो, आपल्या संसाराचा की आपल्या काळ्या कसदार धरणी मायेचा की लाडक्या मुक्या जनावरांचा.एवढे मोठे असतेना त्याच विश्व तरी पण तो विचार करतोना तुमचा, माझा आणि जगाचा पण जग करत का त्याचा विचार नाही ना ?.
आजचं जग माझं, तुमचं आणि सर्वांचं याच जगात किती निर्जीव झालोत आपण, ना वैचारिक क्रांती ना मनी असलेले वैचारिक भाव खूप दूर सोडुन अलोयेत आपण आस वाटत नाही का ? वाटल तरी काय फायदा.
पळणार जग, वळून न पाहणार आजचं जग सामाजिक माध्यमांच्या आहारी इतक गेलय की ते एक व्यसन असच समाजाव. मागील एक, दोन दशकापूर्वी माणस माणसाना बोलायेची, खेड्यातील पारावर, काट्यांवर मैफिल जमायेची आज सार चित्रच बदलून गेलय, ना बोलणारी माणस राहिली ना खेड्यातील पार, फक्त आलय ते जवळ जग पण माणस आपली दुरावली. हेच या जगाच वैशिट्य,' जस की रंग बदलणारा सरडा'.
आज पर्येंत खूप कामे झाली, संशोधन झाल तरी ना जनता सुखी झाली ना अन्नदाता. हेच मोठ न उलगडलेलं कोड पण कधी उलगडयेचे कोडे हाच न सोडवता आलेला प्रश्न. या जगात आज पर्येंत खूप क्रांत्या झाल्या पण या जगाच्या पोशिंद्या साठी एकही क्रांती नाही . ज्या झाल्या पण त्या ही अपुऱ्या याच कारण खरच कुणाला देता येणार नाही . का तर यांच्याशी आमचा संबंध येतोच कुठे,आसच वाटत असेल नाही ना यांना. या शेतकात खूप क्रांती झाली ती आशी की जग खूप आधुनिक झाल पण माणस विचारांनी आधुनिक झालीच नाहीत.
या समाजात विविधता खूप आढळते तशी ती जगात पण आहे आणि माणसात या मुळेच ना प्रश्न सुटतो ना उत्तर मिळते. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच तो तर कुणाला दिसलाच नाही व ना सोडवता आला. या मुळे ना शेतकरी पुढे गेला ना जग. तसं तर सर्वांनाच माहित आहे आजची माझ्या बळीराजाची परिस्थिती या मुळे या वर न भाष्य केलेलं बर. राहिला पर्याय जो की ज्यांना माहीतच नाही शेतकरी म्हणजे काय ? अशांसाठी हा लेख. या घडीला पुष्कळ आशी लोक आहेत की त्यांनी त्यांच्या जीवनात शेती कधीच बघितली नाही. ना पाहिलं एखाद पिक यांना मिळतोच कसा अधिकार शेतकऱ्यावर भाष्य करायेचा. याचाच दुसारा आर्थ जग बदलत जात पण तसं माझ्या बळीराजाच्या बाबतीत का नाही . लोकांना याचं काहीही घेण देन नाही तो कसा जगत असेल. ना त्याच्या पिकला भाव ना ही त्याचा फळाला का बर आस, आज सर्वानीच त्याची थट्टा मांडलीय.तो फक्त जगतोय तो समाजाला द्याव यासाठीच पण समाज बघत बसलाय नुसता.
समाजातील कामगारांची, नौकारदारांची व व्यापाऱ्यांची मुले शिक्षण घेतात मोठे होतात किंवा आपला पारंपारिक व्यवसाय करतात याबाबतीत शेतकऱ्यांच नाही तसं जस मिळाल तसं जागाव लागत. ना पैसा मिळतो ना शिक्षण जरी आजच्या घडीला आर्थिक, सामाजिक व औधोगिक क्रांती घडली असेल तरी शेतकऱ्यांसाठी कोणतीच उपयोगाची नाही कारण या क्रांत्यांमुळे शेतकऱ्यांच प्रश्न सुटलाच नाही ना सुटेल. संकटाना सामोरे जाताना तो एकालाच जातो ना जग मदतीला जात ना समाज. माणूस खूप पुढ गेलाय इतका की मंगळावर राहाण्याच स्वप्न पहातोय आणि पाहिलाही हरकत नाही. त्याआधी इथला ही विचार करायेला पाहिजे, पण तसं काहीच नाही आपले भले अन आपण व आपला संसार.
जो स्व:तासह, आपल्यासाठी व समाजासाठी भर उन्हात राब राब राबतो तो पण आपण नष्ट करत असलेल्या ओझनच्या थराखाली .आपण मात्र बस्तोयेत वातानुकुलीत खोलीत का तर नवीन केलेलं संशोधन, पण तेच तर आपणास सर्वात हानिकारक तरी पण आपण दुर्लक्ष्य कारतोयेत. मला नाही तर सर्वांनाच आवडत नवीन संशोधन पण आति नकोय. जशी दुसरया क्षेत्रात संशोधने झाली तशी शेतीच्या बाबतीत अपुरीच जरी हरित क्रांती झाली असेल तरी आज दुसरया हरीत क्रांतीच गरज आपणास आहे ती हि सेंद्रिय पद्धतीने.
आज वाढत असलेली लोकसंख्या त्या दृष्टीने वाढती शहर , कमी होत चाललेली जमीन यामुळे घटत चालेल उत्पन्न , दुष्काळ, पूर ,भूकंप आणि त्यासुनामी अशी खुप
काही न सोडवता येणारी संकट. याला आपल्यालाच काय तर बळीराजालाही सामोरे जाव लागतं. याला जबाबदार कोण ?......
.